वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ग्राहक वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे असे कर्ज घेणाऱ्यांमध्ये ४९ टक्के जण तरुण आहेत. विशेष म्हणजे ते ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, अशी माहिती ट्रान्सयुनियन सिबिल-गुगल अहवालातून समोर आली आहे. Half of borrowers are in their thirties, according to a survey
फोनवर कर्ज’, ‘हप्त्यावर लॅपटॉप’ आणि ‘महिलांना ३० हजारांचे कर्ज’ यांसारख्या योजनांमुळे कर्जदारांची खरेदीचे वैविध्य वाढत चालले आहे. २०२० मधील ७१ टक्के कर्जदार बिगर मेट्रो भागातील आहेत. तसेच त्यात २४ टक्के महिलांचा समावेश आहे. २५ हजारांपेक्षा कमी रकमेच्या ‘स्मॉल टिकेट’ कर्जांचे प्रमाण २०१७ मध्ये अवघे १० टक्के होते, ते २०२० मध्ये वाढून तब्बल ६० टक्के झाले आहे.
‘फोनवर कर्ज’, ‘हप्त्यावर लॅपटॉप’ आणि ‘महिलांना ३० हजारांचे कर्ज’ यांसारख्या योजनांमुळे या कर्जांचे प्रमाण वाढले आहे. ही कर्जे घेताना जास्त कटकटी नाहीत, तसेच झटपट पेमेंट होते. त्यामुळे त्यांची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक कर्जांपैकी ९७ टक्के कर्जे २५ हजार रुपयांच्या आतील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App