वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे.यंदा सरासरीपेक्षा १०१ टक्के जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने या पूर्वीच वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. Strong monsoon Arrives in the State: Sprinkle in nine Districts
अलिबागमार्गे पुण्यात मान्सूनचं आगमन झाले आहे. सोलापूर मार्गे मॉन्सून तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे त्याची आगेकूच सुरु आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.
मॉन्सूनच्या आगमनामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतकामाला सुरुवात केली. लवकरच विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होईल,असे हवामान खात्याने स्पष्ट केले. दरम्यान,चार दिवस लवकर यंदा पुण्यात मान्सून दाखल झाला. तसेच रत्नागिरीरून तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आगामी 24 तासात राज्यातील विविध भागांमध्ये मॉन्सून सक्रिय होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App