लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलीसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे. दोघेही १९ वर्षांचे आहेत. 19-year-old wife commits murder by strangling her husband
प्रतिनिधी
पुणे: लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलीसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे. दोघेही १९ वर्षांचे आहेत.
अश्विनी मनोहर हांडे (वय १९, रा. उरळी कांचन), गौरव संतोष सुतार (वय १९, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मनोहर हांडे (वय २७, रा़ उरुळी कांचन) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथे मनोहर हांडे यांचा २४ मेला मृत्यु झाला होता. तपासादरम्यान अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने अश्विनीच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. मनोहर हांडे याचे अश्विनीशी जानेवारीमध्ये लग्न झाले होते.
गौरव व अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते. त्यात मनोहर याचा अडथळा ठरत येत होता. गौरव याने अश्विनी हिला झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने मनोहर याला दुधातून या गोळ्या दिल्या. त्यामुळे मनोहर गाढ झोपी गेल्यावर मध्यरात्री २ वाजता त्यांनी गळा दाबून त्याचा खुन केला. त्यानंतर गोळ्यांचे पाकिट फेकून दिले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
West Bengal Violence Governor jagdeep Dhankar Tweet says its Shame to humanity
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App