पंजाबमध्ये कॅ. अमरिंदरसिंग कॉँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत!, आपचे आमदार पक्षात घेऊन दिला पक्षश्रेष्ठींना दिला इशारा

दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्लीदरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच चिडले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांना पक्षात घेऊन त्यांनी पुढील इरादे स्पष्ट केले आहेत. In Punjab CM Amarinder Singh ready to push Congress !, Three Aap MLA took to the party and gave a warning to the party leaders


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्ली दरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच चिडले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांना पक्षात घेऊन त्यांनी पुढील इरादे स्पष्ट केले आहेत.

पंजाबमधील निवडणूक कॅ. अमरिंदरसिंग यांनी एकहाती जिंकली होती. राहूल, प्रियंका किंवा सोनिया गांधी यांचा कोणताही करिष्मा तेथे चालला नव्हता. आताही हिच परिस्थिती आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू आणि मंत्री नवज्योतसिंग सिध्दू याच्या माध्यमातून कॅ. अमरिंदरसिंग यांचे आसन अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी दिल्लीतूनच फूस असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कॅ. अमरिंदरसिंग यांनी आता पक्षश्रेष्ठींनाच धक्का देण्याची तयारी सुरू कली अहे.

राज्यात येत्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. एका बाजुला अकाली दल, भाजप, आप यांच्याशी लढताना कॉँग्रेसच्या नाराजांशीही कॅ. अमरिंदरसिंग यांना लढावे लागत आहे. पंजाब काँग्रेसमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचय तीन सदस्यांच्या समितीला ते भेटले. मात्र, त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आम आदमी पक्षाचे निलंबित झालेले तीन आमदार असे सुखपाल खैरा, परिमल सिंग आणि जगदेव सिंग कमाल यांना पक्षात आणून आपल्या विरोधकांना त्यांनी धक्का दिला आहे.

स्वत:ची ताकद वाढवून पक्षश्रेष्ठींना इशारा कॅ. अमरिंदरसिंग यांनी दिला आहे. कॉँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्यासाठी अप्रिय निर्णय घेतल्यास वेगळा मार्ग चोखाळू शकतो, असेही त्यांनी यातून दाखवून दिले आहे. त्यामुळे एकतर कॅ. अमरिंदरसिंग यांना सर्वाधिकार द्यायचे किंवा पक्षात मोठी फूट स्वीकारण्यास तयार राहायचे या कात्रीत कॉँग्रेसचे नेतृत्व आहे.

In Punjab CM Amarinder Singh ready to push Congress !, Three Aap MLA took to the party and gave a warning to the party leaders

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात