विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉक संदर्भात नवीन नियमावली जाहीर करत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला संभ्रम संपुष्टात आणला. सोमवारपासून राज्यात अनलॉकचे नवे नियम लागू होणार आहेत. कोरोना रुग्ण पॉजिटीव्हीटीचा रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या आधारावर आता निर्बंध शिथील करण्यात येतील. Unlock: Now lock-unlock according to positivity; When will your district be unlocked? Learn more …
राज्य सरकारने हे निर्बंध शिथील करण्यासाठी ५ स्तर निश्चीत केले असून पॉजिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेड हे दोन निकष लावून जिल्ह्यांची वर्गवारी केली आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी परिस्थिती कशी राहणार आहे हे जाणून घेऊयात.
पहिल्या स्तरातले जिल्हे – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसऱ्या स्तरातले जिल्हे – हिंगोली, नंदुरबार
तिसऱ्या स्तरातले जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
चौथ्या स्तरातले जिल्हे – पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
पाचव्या स्तरातले जिल्हे – या गटात अद्याप कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नसलं तरीही आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचा पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर गेला तर हा जिल्हा या रेड झोनमध्ये येऊ शकतो.
( यासंबंधीचा अंतिम निर्णय हा स्थानिक जिल्हा-पालिका प्रशासन घेणार आहे.)
जिल्ह्यांची वर्गवारी करताना राज्य सरकारने जाहीर केलेले निकष –
१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे
२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे
५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती पाहता आठवड्याला या यादीमध्ये बदल होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App