वृत्तसंस्था
मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मुंबई हे पेट्रोलच्या दरात शंभरी पार करणारे पहिले शहर ठरले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात पेट्रोलचे दर हे मुंबईच्या तुलनेत अर्धे आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. Petrol more expensive in Mumbai than New York, Mumbaikars buy at double the rate
मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर हा 100.47 रुपये आहे. डॉलरची तुलना केल्यास हा दर 1.39 डॉलर आहे. न्यूयॉर्कमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर हा 0.79 डॉलर आहे, अशी माहिती ब्लुमबर्गने न्यूयॉर्क स्टेट एनर्जी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या हवाल्यानं दिली आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. लॉकडाऊनचा फटका पेट्रोल विक्रीला बसला आहे. विक्रीत 9.1 टक्क्यांची घसरण झाली. केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने इंधनाच्या करात वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांना जास्त दराने पेट्रोलची खरेदी करावी लागते.
केंद्राचा 33 तर राज्याचा 32 रुपये कर
केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर कर लागतो. त्याशिवाय महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर 25 टक्के आणि डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. तसेच पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर सेस लावण्यात येतो. त्यामुळे अल्पदरात खरेदी केलेले इंधन नागरिकांना चढ्या दराने विकले जात आहे.
इंधनाचे दर दररोज बदलतात
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. किंमती भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी पहाटे सहा वाजता बदलतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App