ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ११०० अंश सेल्यियस तापमानाच्या लाटा उसळत होत्या. कांगोतील शहरात या लाटा घुसूु लागल्या होत्या. मात्र, भारतीय सैनिक सामान्य नागरिकांसाठी सुरक्षेची ढाल म्हणून उभे राहिले. लाखो लोकांना त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचविले. संयुक्त राष्ट्रसंघानेही भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.Salute to Indian troops, rescuing Congo civilians from 1100 degree Celsius lava waves
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर ११०० अंश सेल्यियस तापमानाच्या लाटा उसळत होत्या. कांगोतील शहरात या लाटा घुसूु लागल्या होत्या. मात्र, भारतीय सैनिक सामान्य नागरिकांसाठी सुरक्षेची ढाल म्हणून उभे राहिले.
लाखो लोकांना त्यांनी सुरक्षित स्थळी पोहोचविले. संयुक्त राष्ट्रसंघानेही भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क मुख्यालयात आंतरराष्ट्रीय शांती सैनिक दिन साजरा करण्यात आला.
त्यात भारतीय सैनिकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. भारतीय सैनिकांनी गेल्या आठवड्यात आफ्रिकन देश कांगोमधील निरागोंगो ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
११०० अंश एवढ्या तप्त लाव्हाच्या उसळत्या लाटा शहरात घुसल्या होत्या. (१०० अंश सेल्सियस तापमानाला पाणी उकळते). भारतीय सैनिकांनी सामान्य लोकांना सुरक्षेची जणू ढाल दिली होती.
संयुक्त राष्ट्राने परिस्थितीचे गांभीर्य पाहता शांती सैनिकांना तेथून बाहेर पडण्याची सूचना दिली होती. परंतु भारतीय नेतृत्वाने एक तृतीयांशहून जास्त जवानांना तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सैनिकांचा हा तळ कांगोतील सामान्य लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत होता.
भारतीय सैन्याच्या या तुकडीने लाव्हा कोणत्या बाजूने वाहत येतोय, याचा माग काढला. गोमाची लोकसंख्या ६ लाखांवर आहे. शहरात गोंधळ वाढला होता. हल्लकल्लोळाची स्थिती होती. त्या क्षणी सैन्याने लाव्हाचा मोठा प्रवाह शेजारच्या रवांडा देशाच्या दिशेने वाहतोय.
घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन केले. लाव्हाचा एक प्रवाह गोमाच्या दिशेने होता. सैन्याने त्याच्या संभाव्य मागार्चा अंदाज बांधला. त्यानंतर त्या मार्गावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम पूर्ण केले.
जागतिक शांती मोहिमांत भारताने नेहमीच अतुलनीय कामगिरी केली. चिनी सैनिक भारताच्या तुलनेत दोनपट कमी आहेत. बांगला देश, नेपाळ देखील शांती सैनिक पाठवण्यात चीन व पाकिस्तानपेक्षा पुढे आहेत. भारताने ने ७३ वर्षांत जगातील ४९ मोहिमांत १.९५ लाखांवर सैनिक पाठवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App