पंजाबमधील कॉँग्रेस सरकारअडचणीत सापडले असून २५ आमदार दिल्लीश्वरांकडे गाऱ्हाणे घेऊन जाणार आहेत. आपल्याच पक्षाच्या सरकारने आश्वासन पूर्ण केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, यामागे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि बंडखोर नेते नवज्योतसिंग सिध्दू यांच्या वादाची किनार आहे. त्यामुळे पंजाबमधील कॉँग्रेसचे सरकारच संकटात सापडले आहे.Punjab congres government in danger, 25 MLA reached Delhi
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पंजाबमधील कॉँग्रेस सरकारअडचणीत सापडले असून २५ आमदार दिल्लीश्वरांकडे गाऱ्हाणे घेऊन जाणार आहेत. आपल्याच पक्षाच्या सरकारने आश्वासन पूर्ण केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
मात्र, यामागे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग आणि बंडखोर नेते नवज्योतसिंग सिध्दू यांच्या वादाची किनार आहे. त्यामुळे पंजाबमधील कॉँग्रेसचे सरकारच संकटात सापडले आहे.
पुढील वर्षी होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये थेट दोन गट पडले आहेत. नवज्योसिंग सिध्दू सतत कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर टीका करत आहेत.
काँग्रेस हायकमांडनं पक्षाच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे.पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील ३ सदस्यीय समितीसमोर त्यांच्या समस्या मांडतील.
प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासह सुमारे २५ आमदार दिल्लीत पोहचलेत. निवडणुकीत काँग्रेसनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
केंद्रीय नेतृत्वाने बनवलेल्या ३ सदस्यीय समितीत हरिश रावत मुख्य मल्लिकार्जुन खरगे, जेपी अग्रवाल यांचाही समावेश आहे. सोमवारपासून पंजाबमधील काँग्रस आमदार, मंत्री यांच्या बैठका सुरू झाल्यात. सोमवारी चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा समितीसमोर म्हणणं मांडतील.
त्यानंतर मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू, परगट सिंग समितीसमोर हजर होतील. कॅप्टन अमरिंदर यांचे समर्थक असलेले मनप्रीत बादल, साधु सिंग हेदेखील दिल्लीत आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनादेखील समितीसमोर सादर व्हावे लागणार आहे. परंतु, ते कितपत मान्यता देतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अंतर्गत गटबाजीउफाळून आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू वारंवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात हल्लाबोल करत आहेत. कॉँग्रेसमधीलच अनेक नेते कॅप्टन अमरिंदरसिंग सरकारवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App