वृत्तसंस्था
दुबई : अभ्यासातील गुणवत्तेच्या आधारावर केरळच्या तसनीम अस्लम या विद्यार्थीनीने जगभरातील प्रतिष्ठीत आणि महत्त्वाच्या व्यक्तींनाच दिला जाणारा गोल्डन व्हीसा पटकावला आहे. Kerala girl get golden visa in UAE
युएईमध्ये राहण्यासाठी, काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी विदेशी व्यक्तींना आकर्षित करण्याच्या हेतूने येथील सरकारने २०१९ पासून गोल्डन व्हीसाची योजना सुरु केली आहे.
संयुक्त अरब अमिरातीने या भारतीय विद्यार्थीनीला हा मानाचा व्हिसा दिला आहे. काही काळापूर्वी अभिनेता संजय दत्तलाही हा व्हीसा मिळाला आहे. उच्च क्षमता असलेले विद्यार्थी या प्रकारात तिला ‘युएई’चा गोल्डन व्हीसा मिळाला असून ती या देशात २०३१ पर्यंत राहू शकते.
तसनीम ही शारजा येथील अल कासिमिया विद्यापीठात इस्लामिक शरीया शिकते. या अभ्यासक्रमासाठी ७२ देशांमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तसनीम हिला ४ गुणांकापैकी ३.९४ गुणांक मिळाले. त्यामुळे, केवळ गुंतवणूकीच्या हेतूने युएईमध्ये येणाऱ्या श्रीमंत उद्योगपतींना, डॉक्टरांना, संशोधकांना दिला जाणारा गोल्डन व्हीसा तसनीमला देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App