विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यंदा मॉन्सून नियमित वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रवासासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याचा प्रवास लांबला आहे. त्यातच वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्याने आणि पुरेसे बाष्प नसल्याने मॉन्सूनचे केरळमधील आगमन लांबले आहे. Monsson will come late in Kerala
मॉन्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीच्याहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान बेटांवर गेल्या शुक्रवारी (ता.२१) दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मजल मारत मॉन्सूनने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला होता. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाल्याने मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते.
पुढील दोन ते तीन दिवसांत पोषक स्थिती झाल्यास मॉन्सून तीन जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह मंगळवारपासून सक्रिय होण्याची शक्यता असून, त्यानंतर केरळात पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाचा मॉन्सून येत्या गुरुवारी (ता.३) केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App