विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुढील वर्षासाठी सहा हजार अब्ज डॉलर अर्थसंकल्पाचा प्रस्ताव शनिवारी मांडला. यात गरीब व मध्यमवर्गीयांच्या हिताच्या तरतुदींसह धनाढ्यांवरील करात वाढ करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे.USA president tabled budget
बायडेन यांच्या सहा हजार अब्ज डॉलरच्या अर्थसंकल्पात कोरोनासाठी एक हजार ९०० अब्ज डॉलरची मदत आणि पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेल्या दोन हजार ३०० अब्ज डॉलरचा समावेश आहे.
पायाभूत सुविधांच्या मदतीवर रिपब्लिकन पक्षाची मंजुरी मिळविण्याचे बायडेन यांचे प्रयत्न आतापर्यंत फोल ठरलेले असताना करवाढीच्या मुद्यावर रिपब्लिकन पक्ष ‘फिलिबस्टर’ नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यानंतर १०० सदस्यीय सिनेटमध्ये ६० सदस्यांचे समर्थन मंजुरीसाठी आवश्याक असेल.
सध्याच्या काळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण हलका करण्यासाठी ही करवाढ प्रस्तावित असली तरी त्या प्रतिनिधिगृहांची मंजुरी मिळण्याबाबत तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App