विशेष प्रतिनिधी
कोलकता : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चि म बंगाल या दोन्ही राज्यांना केंद्राकडून तातडीची आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. यातील पाचशे कोटी रुपये ओडिशाला दिले जाणार असून अन्य पाचशे कोटी रुपयांचा निधी हा पश्चिाम बंगाल आणि झारखंडला दिला जाणार आहे. एकंदरीत नुकसानीचा आढावा घेऊनच ही मदत दिली जाईल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) आज सांगण्यात आले. Modi govt. gave 1000 core package to states
ओडिशाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिजम बंगालच्या पाहणी दौऱ्यावर रवाना झाले होते. पश्चिरम मिदनापूरमधील कलाईकुंडा हवाईतळावर सायंकाळी मोदींचे आगमन झाले असता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेत स्वागतही केले. यावेळी वादळाच्या नुकसानीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पंधरा मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मोठी आढावा बैठक पार पडली त्याला मात्र ममता अनुपस्थित होत्या. यामुळे दीदींचा केंद्रावरील राग अद्याप कमी झालेला नाही हेच यातून दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App