विशेष प्रतिनिधी
धरमशाला : तिबेटच्या केंद्रीय प्रशासनाच्या अध्यक्षपदी पेंपा सेरिंग यांचा शपथविधी झाला. १७ व्या संसदेचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते दुसरे अध्यक्ष आहेत. मुख्य न्याय आयुक्त सोनम नोर्बू दाग्पो यांनी पेंपा यांना शपथ दिली. Pempa Sering become Tibet leader
स्वातंत्र्य आणि सत्येवर प्रेम करणाऱ्या तिबेटबाहेरील आपल्या बंधू-भगिनींना पेंपा शुभेच्छा दिल्या अहेत तसेच तिबेटचे संसदीय मित्र, तिबेटला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तींविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पेंपा ५३ वर्षांचे आहेत. याआधी त्यांनी संसदेचे सभापतिपद भूषविले आहे. २००८ ते २०१६ दरम्यान त्यांनी दोन कार्यकाळांत या पदाची जबाबदारी पार पाडली. २०१६ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या वर्षातील निवडणूकीत पेंपा यांना ३४ हजार ३२४ मते मिळाली. दुसरे उमेदवार कायडोर औकात्सांग यांच्यापेक्षा त्यांना पाच हजार ४१७ मते जास्त मिळाली.
विजनवासातील हे सरकार धरमशालामधून कार्यरत आहे. पेंपा यांनी सांगितले की, आपल्या अस्तित्व धोक्यात आलेल्या तिबेटसमोरील महत्त्वाच्या आव्हानांचा सामना आणि तिबेटी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची आपल्या मंत्रिमंडळाची (कशाग) मुख्य जबाबदारी राहील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App