उत्तराखंडच्या तपोवन टनलमध्ये अडकलेल्या 16 जणांची सुटका; इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाचे जवानाचे मदतकार्य


वृत्तसंस्था

ऋषिकेश : उत्तराखंडमधील हिमनदीच्या उद्रेकात चमोली जिल्ह्यातील तपोवन टनलमध्ये अडकलेल्या 16 जणांची सुटका करण्यात यश आले आहे.हिमनदीच्या उद्रेकाची घटना घडताच लष्कराचे जवान घटनास्थळी धावले.Trapped in the Tapovan Tunnel in Uttarakhand 16 released

त्यात इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश होता. तपोवान परिसरातील टनलमध्ये कामगार अडकल्याची माहीती कळताच इंडो तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरु केले. टनलमधून 16 जणांची सुटका जवानांनी आतापर्यत केली असून मदत कार्य सुरू आहे.

मेंढपाळांसह 125 लोक बेपत्ता

दरम्यान, मेंढपाळांसह पाच स्थानिक लोक त्यांच्या 160 मेंढ्या आणि बकऱ्यासह पुरात वाहून गेले. सुमारे 125 लोक बेपत्ता झाले आहेत. ही संख्या अधिक असू शकते, असे मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी सांगितले.

हिमनदीचा उद्रेक का झाला, याचे कारण तज्ज्ञच अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. सध्या आम्ही बचाव आणि मदतकार्यात गुंतलो आहोत, असे रावत यांनी स्पष्ट केले.

Trapped in the Tapovan Tunnel in Uttarakhand 16 released

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती