कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णांमध्ये ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय संशोधनातील दावा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या सौम्य संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये पुढील कित्येक महिने रोगप्रतिकार पेशींकडून प्रतिपिंडे तयार होत असल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय संशोधनात करण्यात आला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. Antibodies find after 11 mont in corona patient

कोरोनाच्या सौम्य संसर्गानंतर पेशींकडून आयुष्यभर प्रतिपिंडांची निर्मिती होऊ शकते, असा दावाही संशोधकांनी केला आहे. त्यमुळे, अशा रुग्णांना दीर्घकाळ प्रतिपंडांचे संरक्षण मिळत असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता कमी असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.



संशोधकांना कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या शरीरात ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडे बनविणाऱ्या पेशी आढळल्या. या पेशी कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या उर्वरित आयुष्यातही प्रतिपिंडांची निर्मिती करत राहतील. कोरोनाच्या संसर्गानंतरच्या दीर्घकालिन प्रतिकारशक्तीचा हाच पुरावा आहे.

संशोधकांनी कोरोना झालेल्या ७७ रुग्णांकडून संसर्गानंतर एक महिन्यांनंतर तसेच तीन महिन्यांनंतर रक्ताचे नमुने घेतले. यापैकी बहुतेकांना कोरोनाचा सौम्य संसर्ग झाला होता. केवळ सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या रुग्णांच्या अस्थीमज्जेची कोरोना न झालेल्या व्यक्तीच्या अस्थीमज्जेशी तुलना करण्यात आली. त्यावेळी, कोरोना रुग्णांच्या अस्थीमज्जेत संसर्गाच्या ११ महिन्यांनंतरही प्रतिपिंडे तयर होत असल्याचे आढळले.

Antibodies find after 11 mont in corona patient

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात