वृत्तसंस्था
पुणे : शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या 4 लाख 24 हजार 801 जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. तब्बल 21 कोटी 24 लाखांचा दंड वसूल केला आहे. Persons in Pune punished for Not Wearing Mask’s; Fine Collection is More Than 21 Crore
सिग्नल आणि विविध चौकात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनेक नागरिक विनामास्क फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला. लॉकडाऊननंतरही भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषतः प्रवासादरम्यान विनामास्क फिरणे, मोटारीतून विनाकारण प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
मागील 18 दिवसांत दररोज सरासरी साडेचार ते पाच हजारांपेक्षा जास्त विमानास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल केला.
86 हजार 800 नागरिक जाळ्यात
लॉकडाऊन नियमावलीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या तब्बल 86 हजार 800 जणांविरुद्ध अवघ्या 18 दिवसांत कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App