वृत्तसंस्था
मुंबई : तुम्ही दोन रोट्या देऊन 20 फोटो काढणार, अशा शब्दात अभिनेते अन्नू कपूर यांनी कलाकारांना फटकारलं आहे. अन्नू कपूर यांच्या वक्तव्यामुळे ढोंगी समाजप्रेमी आणि मदतीच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्यांची मात्र, चांगलीच गोची झाली आहे. Pretending to help is enough ; Annu Kapoor slammed the Actors
कोरोना मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या काही ढोंगी मंडळींवर अभिनेते अन्नू कपूर यांनी जोरदार टीका केली. त्यामुळे कोणाला कोरोनाग्रस्ताचा खरा कळवळा आहे आणि कोण लबाडी करून मदतीच्या नावाखाली स्वतःच उखळ पांढरे करतो, याचा विचार आणि शोध घेण्याची वेळ आली आहे.
कोरोना काळात मदतीसाठी अनेक लोक अत्यंत प्रमाणिकपणे मदत करत आहेत. तर काही लोक माध्यमात झाळकण्यासाठी धडपडत आहेत. अशा लोकांना अभिनेते अन्नू कपूर यांनी फैलावर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनेही मालदिवला जाऊन चित्रिकरण करणाऱ्या कलाकारांना फैलावर घेतलं होतं.
अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीत हा मुद्दा मांडला आहे. ते म्हणतात, अलिकडे मदत करण्याचं फॅड आलं आहे. अनेक कलाकार दोन रोट्या देतात आणि 20 फोटो काढतात. खरंतर उजव्या हाताने दिलेली मदत डाव्या हाताला कळता कामा नये. प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्याचा अट्टाहास बळावला आहे. त्यामुळे हे सारे सुरु आहे. काही मंडळी प्रामाणिक मदत करणारी आहेत.
परदेशी जाऊन इन्स्टाग्रामवर तोकड्या कपड्यातले फोटो टाकणाऱ्या कलाकारांनीही त्यांनी फटाकारलं आहे. तसेच अशा पोस्ट चवीने पाहणाऱ्या नेटकऱ्यांचेही कान पिळले आहेत. बिकिनीतले फोटोना लाईक करता. त्यामुळे फोटो टाकण्याचे पाहण्याचे चक्र सुरु राहते, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App