Buldana : देशात कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून आला आहे. सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अनेक संस्था मदतीसाठी पुढे सरसावलेल्याअसतानाच काही ठिकाणांहून रुग्णांची लूट होत असल्याच्याही तक्रारी आहेत. खामगावातील एका खासगी रुग्णालयाच्या वर्तणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. बिलामध्ये 11 रुपये कमी असल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र ठेवून घेण्यासाठी मागितले. तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज न देण्याचा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला. यामुळे नाइलाजास्तव रुग्णाच्या पत्नीला आपला सौभाग्य अलंकार तिथे द्यावा लागला. Buldana Private Covid Hospital Takes Womens Mangalsutra As her Husbands Recovery Charges
विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : देशात कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिसून आला आहे. सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अनेक संस्था मदतीसाठी पुढे सरसावलेल्याअसतानाच काही ठिकाणांहून रुग्णांची लूट होत असल्याच्याही तक्रारी आहेत. खामगावातील एका खासगी रुग्णालयाच्या वर्तणुकीमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. बिलामध्ये 11 रुपये कमी असल्याने रुग्णालय प्रशासनाने रुग्णाच्या पत्नीचे मंगळसूत्र ठेवून घेण्यासाठी मागितले. तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज न देण्याचा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला. यामुळे नाइलाजास्तव रुग्णाच्या पत्नीने आपला सौभाग्य अलंकार तिथे दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने सरकारी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. यामुळे लोक चांगल्या उपचारांच्या आशेने खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून या महामारीच्या काळातही लोकांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. मागच्या एक वर्षापासून अनेक वेळा खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना वेठीस धरल्याचे प्रकार समोर आले आहेत. बुलडाण्यात अश्विनी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 11 हजार रुपयांसाठी रुग्णाची अडवणूक करून महिलेला गळ्यातील मंगळसूत्र ठेवायला लावल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उठली आहे.
या प्रकारानंतर रुग्ण गवई यांच्या नातेवाइकांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या पत्नीने उपचारासाठी आधीच कानातील दागिने गहान ठेवून 28 हजार रुपये मिळवले होते. ही रक्कम त्यांनी रुग्णालयाला दिल्यावर त्यांच्या बाधित पतीवर उपचार सुरू होते. बरे झाल्यावर पतीला डिस्चार्ज मिळणार होता, परंतु रुग्णाचे बिल केल्यावर 11 रुपये शिल्लक असल्याचे आढळले. महिलेने रुग्णालय प्रशासनाला डिस्चार्जसाठी विनंती केली होती. परंतु उर्वरित पैसे दिल्याशिवाय रुग्णाला सोडणार नसल्याची भूमिका रुग्णालयाने घेतली. तसेच रुग्णाच्या पत्नीला गळ्यातले मंगळसूत्र जमा करण्यास सांगितले.
Buldana Private Covid Hospital Takes Womens Mangalsutra As her Husbands Recovery Charges
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App