विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – कामरेजमधील पाचवी नापास भाजप आमदार व्ही. डी. झालावाडीया यांनी एका आरोग्य केंद्रात सिरींजमध्ये इंजेक्शन भरल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आपण कुणालाही इंजेक्शन दिले नाही, केवळ रुग्णांची सेवा करीत आहोत आणि दोनशेहून जास्त रुग्ण बरे करून उत्तम स्थितीत घरी पाठविले असा दावा त्यांनी केला. Failed MLA create controversy by his act
सार्थना कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. झालावाडीया यांनी सांगितले की, गेली चाळीस दिवस मी हा केंद्रात स्वयंसेवी कार्य करतो आहे. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. मी फक्त रेमडेसिव्हीर डोस सिरींजमध्ये भरला, पण कुणालाही इंजेक्शन टोचले नाही. मी सिरींज भरत असताना जवळपास १०-१५ डॉक्टर उपस्थित होते.
दरम्यान, यावर काँग्रेसने सडकून टीका केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आता आमदार महोदयांकडूनच प्रशिक्षण घ्यावे. तसेच या आमदाराचा पुतळा रुग्णालयात उभारण्यात यावा अशा शब्दांत टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App