कॉर्पोरेट कंपन्या कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारधारारहित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अॅपल या आघाडीच्या कंपनीमध्ये जणू मुस्लिम असोसिएशन निर्माण झाली आहे. अॅपलच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांना पत्र लिहून पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारे पत्रक काढण्याची मागणी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : कॉर्पोरेट कंपन्या कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारधारारहित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अॅपल या आघाडीच्या कंपनीमध्ये जणू मुस्लिम असोसिएशन निर्माण झाली आहे.Muslim Association in Apple, thousands of employees write letters to CEOs demanding support for Palestine
अॅपलच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक यांना पत्र लिहून पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारे पत्रक काढण्याची मागणी केली आहे.
या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की पॅलेस्टाईनमध्ये होत असलेल्या हिंसाचारावरही अॅपलने चुप्पी साधली आहे हे त्यांना वैफल्यग्रस्त करणारे आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा कर्मचाऱ्याच्या मोठ्या गटाने कंपनीच्या धोरणावर टीका केलीआहे.
सुमारे हजारावर कर्मचाऱ्यांनी एक अंतर्गत पत्र लिहिले आहे. यामध्ये सीईओ कूक यांनी तातडीने सार्वजनिक स्तरावर भूमिका घेऊन पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारे पत्रक काढावे असे म्हटले आहे.
आत्तापर्यंत मानवाधिकारांवर उच्चरवाने बोलणारे अनेक प्रभावी आणि उच्च पदावरील लोक पॅलेस्टाईनच्या प्रश्नाबाबत मात्र गप्प आहेत. काही जण इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन दोघांनाही सल्ले देत आहेत.
त्यामुळे आम्हा कर्मचाºयांना मोठा धक्का बसला आहे, असे पत्र स्वत:ला अॅपल मुस्लिम असोसिएशनचे सदस्य म्हणविणाऱ्यांनी लिहिले आहे.अॅपलने यापूर्वी इस्त्राएल-पॅलेस्टाईन संघर्षावर समतोल भूमिका घेतली होती.
सर्वच जीव महत्वाचे आहेत असे म्हटले होते. आम्हाला पॅलेस्टाईन नागरिकांप्रति सहानुभूती आहे, असेही म्हटले होते.गाझा पट्टीत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिले आहे.
इस्त्राएली लष्कराने घुसखोरी करत २३२ पॅलेस्टिनी नागरिकांना ठार मारले. यामध्ये ६५ बालके आणि ३९ महिलांचा समावेश आहे. हमास या दहशतवादी गटाने सुमारे बारा इस्त्राएली नागरिकांना ठार मारले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App