विशेष प्रतिनिधी
तिरूअनंतपुरम : केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांनी महत्त्वाची खाती स्वतःच्याच हातामध्ये ठेवली असून त्यामध्ये गृह आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा समावेश आहे.Vina George become new health minister
विजयन यांचे जावई पी.ए, मोहंमद रियाझ यांना सार्वजनिक बांधकाम आणि वीणा जॉर्ज यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
वीणा जॉर्ज या माजी पत्रकार असून त्या नुकत्याच अरणमुला मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. मागील सरकारमधील लोकप्रिय मंत्री के.के. शैलजा यांच्याऐवजी जॉर्ज यांना संधी देण्यात आली आहे.
गृह, देखरेख आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती विजयन यांच्या ताब्यात असतील त्यांचे विश्वामसू सहकारी के.एन. बालागोपाल यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. पक्षातील दिग्गज नेते टी.एम.थॉमस इसाक यांच्याऐवजी त्यांना संधी देण्यात आली आहे.
वीणा जॉर्ज यांच्याकडे महिला आणि बालकल्याण हे खाते देखील सोपविण्यात आले आहे. विजयन यांनी गुरुवारीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटप केले होते आज ते अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App