वृत्तसंस्था
नागपूर : केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडीद डाळीच्या आयातीवर असलेले प्रतिबंध 15 मे रोजी शिथिल केले. त्यामुळे डाळी स्वस्त होण्यास प्रारंभ झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. Pulses Rate came down! , Rates Dropped as imports opened; Pigeon Peas (Turdal) cheaper by Rs 300
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच महागाई वाढली. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. डाळीच काय विचारायची सोयच नव्हती. अन्य किराणा सामानाचे दर चढेच आहेत. त्यावर अंकुश नाही.
तूरडाळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. तूर, मूग आणि उडदाच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली. यामुळे सर्वसामान्य ग्राहक सुखावला आहे.
देश डाळींमध्ये आत्मनिर्भर बनावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करता येईल.
बुधवारी सायंकाळी तुरीत २०० आणि तूरडाळीच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. मुंबई आयातीत लेमन तूर प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,३००, नागपुरात गावरान तुरीचे दर ७,१५० रुपयांवरून कमी होऊन ६,९५० आणि डाळीचे भाव ८,७०० ते १० हजार १०० रुपये होते. याशिवाय आयातीत उडद मुंबई पोर्टवर २०० रुपयांनी कमी होऊन ६,८००, उडद मोगर ८,४०० ते १० हजार ७०० रुपये आणि चण्यात २०० रुपयांची घसरण झाली. चणाडाळीचे भाव ६,१०० ते ६,७०० रुपयांवर स्थिरावले. डाळीचे भाव ६,६०० ते ६,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर मूग मोगर ८,५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा परिणाम पुढेही घसरणीवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App