केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. सहा एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एलडीएफने 140 पैकी 99 जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे.In Kerala, Veena George, a woman journalist, will be the minister
विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : केरळच्या इतिहासात प्रथमच एक महिला पत्रकार मंत्री बनणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यासदस्या वीणा जॉर्ज केरळच्या मंत्री बनल्या आहेत.
गुरुवारी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यासह नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. सहा एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ एलडीएफने 140 पैकी 99 जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे.
वीणा जॉर्ज यांनी मल्याळम भाषेतल्याअनेक चॅनेल्सवर पत्रकार आणि न्यूज अँकर म्हणून काम केलं आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2016च्या विधानसभा निवडणुकीत अरनमुला मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या वीणा यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवदासन नायर यांना 7646 मतांनी हरवलं होतं.
न् वीणा जॉर्ज यांच्या राजकीय कारकिदीर्ची ती सुरुवात होती. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पठान मथिट्टा जिल्ह्याच्या मतदारसंघातून वीणा यांनी तब्बल 19 हजार मतांधिक्याने विजय प्राप्त केला.
45 वर्षांच्या वीणा जॉर्ज यांना दोन मुलं आहेत. त्यांनी भौतिक विज्ञानात एमएस्सीचं शिक्षण घेतले असून बीएड झाल्या आहेत. सध्या त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पठान मथिट्टा क्षेत्र समितीच्या सदस्या आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती.
वीणा जॉर्ज यांचे पती डॉ. जॉर्ज जोसेफ हे एक उच्च माध्यमिक शिक्षक असून, मलंकारा ऑ र्थोडॉक्स सीरियन चर्चचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App