वृत्तसंस्था
अहमदनगर : राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख आहे. परंतु, मुंबई, पुण्यातील कोरोना रुग्णांपेक्षाही दुप्पट रुग्ण अहमदनगरमध्ये आढळले आहेत. यामुळे राज्याबरोबरच केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. Ahmednagar has twice new Coronavirus patients compare to Mumbai and Pune
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी कोरोनाने थैमान घातले होते. त्याचे लोण आता अहमदनगरकडे पसरल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात मंगळवारची आकडेवारी जाहीर केली.
त्यात मुंबई महापालिकेत 961 आणि पुणे महापालिकेत 1090 आणि अहमदनगरमध्ये 1917 रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या मुंबई आणि पुण्यातील रुग्णसंख्येपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे चिंता वाढू लागली आहे.
अहमदगनरमध्ये आता एकूण 1,67,867 रुग्ण आहेत. दिवसभरात 11 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा 1,597 वर पोहोचला आहे. याआधी केंद्रानेही देशातील कोरोनाचा रिपोर्ट जारी केला होता.
महाराष्ट्रात अहमदनगरमध्येच कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याचं सांगितलं होतं. या एकट्या जिल्ह्याने राज्यासह केंद्राची चिंता वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App