कॉँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. गेले काही दिवस ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. Congress leader Rajiv Satav’s health deteriorated again
प्रतिनिधी
पुणे : कॉँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. गेले काही दिवस ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच सातव यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र त्यांना न्युमोनिया झालेला असल्याने त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. काही दिवसांपूर्वी सातव यांचा कोरोना बळावल्याने जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच व्हेंटिलेटरवर काढण्यात आला होता. मात्र, दोन दिवसानंत त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जहांगीर रुग्णालयात जाऊन थोरात यांचा प्रकृतीची विचारपूस केली. थोरात म्हणाल, माझी आत्ता डॉक्टरांशी चर्चा झाली नाही. मात्र वर्षा गायकवाड या इथेच आहेत. त्यांची डॉक्टरांशी चर्चा झालेली आहे. सातव यांची प्रकृती सुधारत होती. मात्र, पुन्हा थोडा त्रास झालेला आहे.पण ते लवकरच बरे होतील
19 एप्रिल ला सातव यांना कोरोना ची लक्षणे जाणवली होती त्यानंतर 23 तारखेपासून ते पुण्यात उपचार घेत आहेत. त्यांची तब्येत सुधारत असतानाच काल सातव यांना त्रास झाला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या कालपासून मुक्कामी थांबल्या आहेत. रजनी सातव आज सकाळी पोचल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App