
विशेष प्रतिनिधी
यंगून : म्यानमारमधील लोकप्रिय तरूण कवी खेट थी यांचा अटकेदरम्यान मृत्यू झाला आहे. सत्ता ताब्यात घेतलेल्या लष्कराच्या कायदेमंडळावरील टीकेमुळे त्यांचा गळा घोटण्यात आल्याची दाट शक्यता आहे.Popular poet died in Myanmar
खेट ४५ वर्षांचे होते. त्यांनी लष्करी उठावाला विरोध केला होता. ते डोक्यात गोळी घालतात, पण क्रांती ह्रदयातून होते हे त्यांना माहीत नाही, अशा त्यांच्या ओळी आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
सागैंग प्रांतातील श्वेबो गावात शनिवारी खेट यांना पत्नी चॉ सू यांच्यासह चौकशीसाठी सशस्त्र जवान आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. चॉ सू यांनी बीबीसी बर्मीज वृत्तसंस्थेला मोनीवा येथून सांगितले की, माझी चौकशी झाली.
खेट यांचीही चौकशी झाली. त्यांना चौकशी ठाण्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण ते परत आले नाहीत, त्यांचे पार्थिवच आले. लष्कराने खेट यांच्या पार्थिवाचे दफन करण्याची तयारी केली होती. त्यामुळे चॉ सू यांना मनधरणी करावी लागली.
Popular poet died in Myanmar
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस २०२४ मध्ये राजकीय पटलावर असेल का? संजय राऊत यांचा सवाल
- अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य
- निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ
- लखनऊमध्ये थायलंडच्या कॉलगर्लच्या मृत्यूनंतर अनेक बडे नेते, व्यावसायिक पोलीसांच्या रडारवर
- भारत बायोटेककडून राज्यांना थेट लस पुरवठा, १४ राज्यांमध्ये सुरूवातही
- म्यानमारमधील विद्यापीठांतून अनेक जण निलंबित, लष्करासोबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा संघर्ष