Mothers Day : जगभरात आज मदर्स डे साजरा केला जात आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलमधून दु:खद वर्तमान समोर आले आहे. कोरोना महामारीमुळे येथे लहानग्यांपासून त्यांच्या ‘आई’ची ताटातूट होत आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गानंतर आईचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 4000 हून अधिक गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 494 महिलांचा मृत्यू झाला. हे मृत्यू प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर झाले. ज्यामुळे शेकडो नवजात मुले आणि त्यांच्यापूर्वी असलेली त्यांची भावंडे अनाथ झाली आहेत. Mothers Day Story, Brazil faces risk of a generation of orphans as coronavirus kills pregnant and post-partum women
वृत्तसंस्था
रिओ दि जानेरिओ : जगभरात आज मदर्स डे साजरा केला जात आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलमधून दु:खद वर्तमान समोर आले आहे. कोरोना महामारीमुळे येथे लहानग्यांपासून त्यांच्या ‘आई’ची ताटातूट होत आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गानंतर आईचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 4000 हून अधिक गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 494 महिलांचा मृत्यू झाला. हे मृत्यू प्रसूतीपूर्वी किंवा प्रसूतीनंतर झाले. ज्यामुळे शेकडो नवजात मुले आणि त्यांच्यापूर्वी असलेली त्यांची भावंडे अनाथ झाली आहेत.
ब्राझीलमध्ये वृद्ध महिला यापूर्वी कोरोनामुळे मरत होत्या, परंतु कोरोनाच्या अमेझोनियन व्हेरिएंटच्या आगमनानंतर तरुण स्त्रियादेखील संक्रमित झाल्या आहेत. त्यांचे मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत आहेत. 40, 30 आणि 20 वर्षे वयाच्या तरुण स्त्रियाही कोरोनामुळे बळी जात आहेत. सर्वात वाईट बाब म्हणजे कोरोना विषाणू ‘आई’ बनणाऱ्या महिलांना घेऊन जात आहे. यामुळे असंख्य नवजातांचे मायेचे छत्र हरपले आहे. ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसच्या अमेझॉन व्हेरिएंटमुळे गेल्या चार महिन्यांत 500 तरुण गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात गर्भवती महिलांची मोठी संख्या आहे. गर्भवती महिला आणि नवजात मुलांची देखभाल करणाऱ्या एका गटाने म्हटले आहे की, मागच्या 9 महिन्यांतही या वर्षाच्या चार महिन्यांइतके मृत्यू झाले नव्हते.
Brazil faces ‘risk of a generation of orphans’ as coronavirus kills pregnant and post-partum women https://t.co/mvqtom9HaT — South China Morning Post (@SCMPNews) May 9, 2021
Brazil faces ‘risk of a generation of orphans’ as coronavirus kills pregnant and post-partum women https://t.co/mvqtom9HaT
— South China Morning Post (@SCMPNews) May 9, 2021
ऱ्होड आयलँडच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीचे संशोधक डेबोरा डेनिझ म्हणाल्या की, ब्राझीलमधील गर्भवती महिलांसाठी आरोग्य सुविधा यापूर्वीच कमकुवत आहेत. कोरोना साथीच्या नंतर, प्रसूतीनंतर गर्भवती महिलांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. येथील रुग्णालये त्यांना पूर्ण सुरक्षा देऊ शकत नाहीत. या देशात ‘आई’चे असे हाल होत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना विषाणूमुळे ब्राझीलमध्ये प्रसूतीपूर्व काळात महिलांचा मृत्यू जास्त आहे. यामुळे त्यांना निओ-नेटल समस्या आहेत. जर एखाद्या गर्भवती महिलेस आधीपासूनच कोणताही सामान्य रोग किंवा हिमोग्लोबिनचा अभाव असेल आणि तिला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तिची प्रकृती जास्तच गंभीर होते.
कोरोनाची दुसरी लाट ब्राझीलमध्ये आली तेव्हा नागरिकांनी सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे या देशात कोरोना महामारीने भयंकर रूप धारण केले आहे. आता सरकारने कठोर पावले उचलली असली, तरी त्याला बराच उशीर झाला आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज 3000 मृत्यू होत आहेत. येथे आतापर्यंत 4 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत. अमेरिकेनंतर संसर्ग आणि मृत्यूच्या बाबतीत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे.
Mothers Day Story, Brazil faces risk of a generation of orphans as coronavirus kills pregnant and post-partum women
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App