
MK Kaushik And Ravinder Pal Singh Death : 8 मे हा भारतीय हॉकीसाठी एक वाईट दिवस ठरला. देशातील दोन हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांचे कोरोनामुळे निधन झाले. रविंद्र पाल यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला, तर कौशिक यांच्या निधनाचे वृत्त संध्याकाळी आले. दोघे काही दिवसांपासून आजारी होते व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. India loses 2 Olympic gold medalists Hockey Player in a single day due to corona, MK Kaushik And Ravinder Pal Singh Death
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 8 मे हा भारतीय हॉकीसाठी एक वाईट दिवस ठरला. देशातील दोन हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते रविंदर पाल सिंह आणि एमके कौशिक यांचे कोरोनामुळे निधन झाले. रविंद्र पाल यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला, तर कौशिक यांच्या निधनाचे वृत्त संध्याकाळी आले. दोघे काही दिवसांपासून आजारी होते व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भारताच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य असलेल्या कौशिक यांना दिल्लीतील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. कौशिक 17 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या मुलाने पीटीआयला सांगितले की, “त्यांना आज सकाळी व्हेंटिलेटर लावण्यात आले होते, परंतु त्यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला.”
Hockey India griefs the loss of Mr. M. K. Kaushik, Gold Medal winning Olympian and former Coach of the Indian Hockey Team.
#IndiaKaGame pic.twitter.com/CQxcTdry3D
— Hockey India (@TheHockeyIndia) May 8, 2021
कौशिक यांना भारतीय हॉकीमध्ये मानाचे स्थान आहे. ते 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या भारतीय संघाचे सदस्य होते. हे भारताचे शेवटचे ऑलिम्पिक हॉकी पदक होते. त्यानंतर हॉकीच्या माध्यमातून भारताला ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक मिळालेले नाही. एवढेच नाही, तर कौशिक यांनी भारताच्या ज्येष्ठ पुरुष आणि महिला या दोन्ही संघांना प्रशिक्षण दिले आहे. 1998 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार आणि 2002 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Saddened to learn about the loss of former India International who was part of the Gold Medal winning Indian squad at the 1980 Moscow Olympics, Mr. Ravinder Pal Singh.
Hockey India sends its condolences to his family and loved ones.
#IndiaKaGame pic.twitter.com/vHjIQlrDqW
— Hockey India (@TheHockeyIndia) May 8, 2021
रवींदर पाल सिंग यांचेही निधन
8 मे रोजी सकाळी भारतीय हॉकीचे माजी खेळाडू रवींदर पाल सिंह यांचेही कोरोनामुळे निधन झाले. रवींदर पाल सिंह यांचा कोरोनाशी 2 आठवडे झुंज दिली. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रविंदर पाल सिंह यांनी शनिवारी सकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षांचे होते. 1980च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय संघाचा ते एक भाग होते.
हॉकी इंडियाने वाहिली श्रद्धांजली
हॉकी इंडियानेही कौशिक यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. हॉकी इंडियाने ट्विट केले की, “हॉकी इंडिया ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकणारे खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक एम. के. कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे.”
Again a sad day for Indian Hockey. We lost MK Kaushik ji, member of the Indian Hockey Team that won gold at 1980 Moscow Olympic. He also coached the 1998 Asian Games men's team & 2002 Commonwealth Games Women's team. Both teams won Gold. Salute to Kaushik Ji. Rest in peace
pic.twitter.com/Edp2vXOklK
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) May 8, 2021
किरण रिजिजू यांनीही व्यक्त केले दुःख
कौशिक यांच्या मृत्यूवर क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनीही शोक व्यक्त केला आहे. रिजिजूंनी लिहिले की, “भारतीय हॉकीसाठी वाईट दिवस. आम्ही मॉस्को ऑलिम्पिक 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकणार्या भारतीय हॉकी संघाचा एक भाग असलेले एमके कौशिक यांना गमावले. त्यांनी आशियाई खेळ-1998 मध्ये पुरुष संघ आणि राष्ट्रकुल खेळ -२००२ मध्ये महिला संघाला प्रशिक्षण दिले. दोन्ही संघांनी सुवर्णपदके जिंकली. कौशिकजी यांना सलाम!”
India loses 2 Olympic gold medalists Hockey Player in a single day due to corona, MK Kaushik And Ravinder Pal Singh Death
महत्त्वाच्या बातम्या
- Mission Oxygen : ऑक्सिजन पुरवणाऱ्या वाहनांना दोन महिन्यांसाठी टोल माफी, NHAIचा मोठा निर्णय
- सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील कोरोना संसर्गावरून व्यक्त केली चिंता, कैद्यांना गतवर्षीसारखाच पॅरोल देण्याचे आदेश
- ‘आप’चे पाप : ऑक्सिजनअभावी दिल्ली तडफडताना मंत्री इमरान हुसेन यांची सिलिंडर्सची साठेबाजी, हायकोर्टाने बजावली नोटीस
- केंद्राचा मोठा निर्णय, ब्रिटनला पाठवले जाणारे कोव्हिशील्ड लसीचे 50 लाख डोस भारतातच वापरणार, राज्यांना मिळणार दिलासा
- ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना, 10 प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश