कोरोना संकटात राज्यात दिलासादायक चित्र, १५ जिल्ह्यांतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट, लसीकरणाबाबतही आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वाची घोषणा

Health Minister Rajesh Tope important announcement regarding corona crisis in the state, reduction in daily Cases in 15 districts

Health Minister Rajesh Tope :  देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सर्वाधिक विध्वंस घडवला आहे. यादरम्यान आता एक दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात लॉकडाऊनसद़ृश्य निर्बंधांनंतर आता दैनंदिन रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Health Minister Rajesh Tope important announcement regarding corona crisis in the state, reduction in daily Cases in 15 districts


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सर्वाधिक विध्वंस घडवला आहे. यादरम्यान आता एक दिलासादायक चित्र दिसून येत आहे. राज्यात लॉकडाऊनसद़ृश्य निर्बंधांनंतर आता दैनंदिन रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील लसीकरणाबाबत

मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.

दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार, तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.

स्पुटनिक लसीचे दर निश्चित नाहीत

स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू आहे. दर निश्चित झाल्यानंतर या लसीचेही डोस राज्यात मागविले जातील. याशिवाय तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

जागतिक निविदांना चांगला प्रतिसाद

राज्य शासनाने रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदांच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिव्हिर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणेकरून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.

राज्यात 150 ऑक्सिजन प्लांट

राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुनर्वसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले. केंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील ९ प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील रेमडेसिव्हिरची स्थिती

सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजारांच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत. याशिवाय राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली असून महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Health Minister Rajesh Tope important announcement regarding corona crisis in the state, reduction in daily Cases in 15 districts

महत्त्वाची बातमी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात