विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत ‘तुम्ही भाजपच्या उमेदवाराला जास्त मत देऊन यांचा करेक्ट कार्यक्रम करा, मी राज्यात “यांचा” कार्यक्रम करतो’ असे आवाहन केले होतं. अखेर फडणवीसांच्या आवाहनाला पंढरपूरकारांनी हाक देत राष्ट्रवादीला आस्मान दाखवले आहे. Devendra fadanavis targets NCP over pandharpur defeat
समाधान आवताडे यांनी 3716 मतांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानात समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. मधल्या काही फेरीत आवताडे हे मागे पडले होते. पण समाधान आवताडे यांनी नंतर आघाडी घेतली ती 36 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. नंतर याचे रुपांतर विजयात झाले आहे.
भगीरथ भालके आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये कडवी झुंज सुरू होती. कधी राष्ट्रवादी पुढे तर कधी भाजप आघाडी घेत होती. एकूण 38 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. 7 व्या फेरीपासूनच समाधान आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारली आणि मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या फेरीअखेर समाधान आवताडे यांना विजयी घोषित करण्यात आले. राष्ट्रवादीने पंढरपूरमध्ये झालेला पराभव स्विकारला आहे. हा धनशक्तीचा विजय असल्याची टीकाही राष्ट्रवादीचे नेते लतिफ तांबोळी यांनी केली.
आतापर्यंतचा निकाल
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App