Kerala Election Results 2021 Live : केरळमध्ये सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून डाव्यांना स्प्ष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सध्या 79 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 59 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये विधानसभेची एकूण संख्या 140 आहे आणि बहुमताचा आकडा 71 आहे. एक्झिट पोलच्या निकालांमधून असं दिसून येत आहे की एलडीएफच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन होऊ शकते. Kerala Election Results 2021 Live: early Trends Shows Left is moving towards a clear majority in Kerala
विशेष प्रतिनिधी
तिरुवनंतपुरम : रविवारी सकाळी आठ वाजता केरळ विधानसभेच्या 140 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. यूडीएफ आणि एलडीएफ या दोन्ही आघाड्यांना राज्याच्या सत्तेत यायचे आहे. या दोन्ही बाजूंमध्ये कांटे टक्कर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सत्ता कायम राखायची आहे, तर कॉंग्रेसला राज्यात सत्ता मिळवून पुन्हा एकदा पक्षात प्राण फुंकायचे आहेत. यामुळे दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. केरळ हे देशातील एकमेव डावे राज्य असल्याने आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या केरळ मोहिमेचे नेतृत्व केले असल्याने ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. केरळमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 70.52 टक्के लोकांनी मतदान केले आहे.
केरळमध्ये सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून डाव्यांना स्प्ष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष सध्या 79 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 59 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये विधानसभेची एकूण संख्या 140 आहे आणि बहुमताचा आकडा 71 आहे. एक्झिट पोलच्या निकालांमधून असं दिसून येत आहे की एलडीएफच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन होऊ शकते.
2016 च्या केरळ विधानसभा निवडणुकांकडे पाहिल्यास एका टप्प्यात झालेल्या मतदानात एलडीएफने 140 पैकी 91 जागा जिंकून सरकार स्थापन केले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. राज्यात बहुमतासाठी 71 जागांची आवश्यकता आहे. याच निवडणुकीत भाजपला 1, माकपला 19, माकपला 58, कॉंग्रेसला 22, राष्ट्रवादीला 2, आययूएमएल 18, जेडीएसला 03, केरळ कॉंग्रेसला (एम) 1 आणि इतरांना 11 जागा मिळाल्या.
विशेष म्हणजे केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयन सत्तेत टिकून राहिल्यास या परंपरेला हा छेद असेल. राज्यात भाजपने आक्रमक प्रचार मोहीम केलेली असली तरी कोणत्याही एक्झिट पोलने भाजपसाठी राज्यात तीन ते पाचपेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तविला नाही.
Kerala Election Results 2021 Live: early Trends Shows Left is moving towards a clear majority in Kerala
https://youtu.be/SX-kLapsOs4
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App