गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना भारतीय जीवन बीमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीवरून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच एलआयसीने तब्बल ३७ हजार कोटी रुपये नफा कमाविला आहे. गेल्या ६७ वर्षांतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४४.४ टक्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीला २०२० मध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २५,६२५ कोटी रुपये नफा झाला आहे.Stock market blows LIC’s revenue, record profit of Rs 37,000 crore from investments
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरू असताना भारतीय जीवन बीमा निगमने (एलआयसी) शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीवरून चिंता व्यक्त केली जात होती.
मात्र, शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच एलआयसीने तब्बल ३७ हजार कोटी रुपये नफा कमाविला आहे. गेल्या ६७ वर्षांतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षीपेक्षा ४४.४ टक्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीला २०२० मध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २५,६२५ कोटी रुपये नफा झाला आहे.
एलआयसी ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक संस्थाही आहे. एलआयसीने २०२१ मध्ये ९४ हजार कोटी रुपये गुंतविले होते. विशेष म्हणजे एलआयसी ३४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करते. गाहकांना पॉलीसी विकून मिळालेला नफा सर्वात जास्त आहे.
एलआयसीला झालेल्या विक्रमी नफ्यामुळे गुंतवणूकदार खुशीत आहेत. कारण त्यांना मिलणारा लाभांश वाढणार आहे. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरील नफाही वाढणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊन बाजार कोसळला. मात्र, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे बुस्टर दिले. त्यामुळे शेअर बाजार सावरला. यामुळे एलआयसीचा नफा वाढला.
एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश कुमार गुप्ता म्हणाले, आम्ही नवीन संधींचा शोध घेत गेलो. दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण आखले. त्यामुळे आमच्या नफ्यात वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App