गेल्या आठवड्यापर्यंत जगाची फार्मसी म्हटल्या जाणाऱ्याआणि लस उत्पादनातील सर्वात मोठ्या कंपन्या असलेल्या भारताला लसनिर्मितीचा फॉर्म्युला देणे चुकीचे असल्याचे मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण जगातून टीकेचा भडिमार होत आहे.Criticism of Bill Gates over anti-India remarks
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापर्यंत जगाची फार्मसी म्हटल्या जाणाºया आणि लस उत्पादनातील सर्वात मोठ्या कंपन्या असलेल्या भारताला लसनिर्मितीचा फॉर्म्युला देणे चुकीचे असल्याचे मत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस यांनी म्हटले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण जगातून टीकेचा भडिमार होत आहे.भारतासहीत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये असे वक्तव्य बिल गेटस यांनी केले आहे.
बिल गेट्स यांनी स्काय न्यूज या विदेशी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. यावेळी सध्याच्या वैश्विक कोरोनास्थितीवर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बैद्धिक संपदा हक्का हा कायदा बाजूला केल्यामुळे जगातील सर्व देशांना कोरोना लस मिळण्यासाठी मदत होईल का ?
असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लसीचा फॉम्यूर्ला इतर देशांना देण्यात येऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. जगात अनेक औषधनिर्माण करणाºया कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती करत आहेत.
सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉम्यूर्ला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फरक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
लस निर्मितीचा फॉम्यूर्ला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाहीये. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे.
लस तयार करताना काळजी घ्यावी लागते. टेस्टिंग तसेच ट्रायल करावे लागतात. तसेच लस तयार करताना खूप खबरदारी घ्यावी लागते, असे गेटस म्हणाले.
भारतविरोधी वक्तव्य करणाºया गेटस यांच्यावर संपूर्ण जगातून टीका केली जात आहे. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी आॅफ अॅक्सेस येथील कायद्याच्या प्राध्यापिका तारा वान म्हणाल्या, भारतातील लोकांच्या मृत्यूला रोखले जाऊ शकत नसल्याचे बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
पश्चिमी देश भारताला मदत कधी करणार आहेत. मुळात अमेरिका आणि ब्रिटनने बौद्धिक संपदा हक्काच्या अधिकाराखाली इतर विकसनशील देशांना ओलीस ठेवले आहे. हे अतिशय घृणास्पद आहे.
पत्रकार स्टीफन बर्नी म्हणाले, आपण जास्त लसनिर्मिती करु शकत नाही. आपण नफ्याशी तडजोडसुद्धा करु शकत नाहीयेत. त् तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसीनशील देशांवर विश्वास ठेवू शकत नाही. आपण खाऊन झाल्यावर त्या देशांना आपलं उष्ठं मिळेल. हे अतिशय चुकीचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App