विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या ऐतिहासिक ‘अपोलो ११’ या चांद्रमोहिमेत नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांच्याबरोबरच अवकाश यानातील तिसरे अवकाशवीर असलेले मायकेल कॉलिन्स (वय ९०) यांचे कर्करोगाने निधन झाले. १९६९ मधील ऐतिहासीक मोहिमेत आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते, तर कॉलिन्स यांनी अवकाशयानात बसून इतर तांत्रिक जबाबदारी सांभाळली होती. Micel collins pass away apolo mission
‘अपोलो ११’ या जगप्रसिद्ध मोहिमेदरम्यान चंद्रापर्यंत जाण्यासाठी कॉलिन्स यांनी दोन लाख ३८ हजार किलोमीटरचा अवकाशप्रवास केला असला तरी त्यांना चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, याचे त्यांना अजिबात दु:ख वाटत नव्हते. त्यांनीच अवकाश यानाचे संचालन केले होते.
इतर दोघे अवकाशवीर चंद्रावर उतरल्यानंतर कॉलिन्स हे २८ तास एकटेच अवकाशयानात होते. कॉलिन्स यांनी तांत्रिक बाजू उत्तमरित्या सांभाळली नसती तर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन हे दोघे चंद्रावरच अडकून पडले असते. मोहिमेतील नील आर्मस्ट्राँग यांचे २०१२ मध्ये निधन झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App