विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आसाममध्ये पुन्हा भाजप आणि आसाम गणपरिषद,यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरलची राजवट पुन्हा येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविला आहे. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने सहा पक्षांची मोट बांधली आहे. परंतु ते पराभूत होण्याची शक्यता सर्वच संस्थांच्या अहवालात वर्तविली आहे. काँगेस आणि मुस्लिम पक्षाच्या आघाडीमुळे भाजप आघाडीच्या ७-१२ जागा कमी होण्याची अंदाज आहे. Assam The Focus India Exit Poll Results 2021
राज्यात 126 विधानसभा मतदारसंघांत तीन टप्प्यांत मतदान पार पडलं. २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात जवळपास ८२.०४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये एकीकडे भाजप, आसाम गण परिषद, यूनायटेड पिपल्स पार्टी लिबरल सोबत निवडणूक लढवली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने 6 पक्षांसोबत महाआघाडी केली आहे. त्यात बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वातील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट ( AIUDF) सह BPF, CPI, CPI-M आणि आंचलिक गण मोर्चाचा सहभाग आहे. भाजप मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या तर काँग्रेस आघाडी तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App