वृत्तसंस्था
अलाहाबाद : उत्तर प्रदेशात लॉकडाऊन लावायचा का नाही, यावरून सरकार आणि न्यायालयात जोरदार चर्चा सुरु आहेत. सरकार म्हणते लॉकडाऊन नको तर उच्च न्यायालय म्हणते जीव महत्वाचा असल्याने लॉकडाऊन आवश्यक आहे. आता उच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावावा, अशी विनंती राज्य सरकरला केली आहे. Please lockdown in Uttar Pradesh; High Court joins hands with government
राज्यात कोरोनाचे तांडव सुरु असून रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. डॉक्टरांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे दोन आठवडयांचा लॉकडाऊन लावा, अशी विनंती हात जोडून करत आहोत, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयाने सहा शहरांत लॉकडाऊनचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. बुधवारी न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा त्यांनी हात जोडून विनंती करतो, लॉकडाऊन लावा, अशी सूचना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App