…तर २०२२ मध्ये महाराष्ट्रातही होऊ शकते विधानसभा निवडणूक, हे आहे कारण!

Possibility Of Maharashtra Assembly Elections in 2022

Maharashtra Assembly Elections : २०२२ हे वर्ष भारताच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आठ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निकालांचा थेट परिणाम केंद्राच्या राजकारणावर होईल. या आठ राज्यांपैकी सहा राज्यांत भाजपचे सरकार आहे. यापैकी पंजाब हे एकमेव असे राज्य आहे, जेथे भारतातील मुख्य विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेसचे सरकार आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा संपुष्टात आणल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर तेथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. Possibility Of Maharashtra Assembly Elections in 2022


विशेष प्रतिनिधी

मुंबई : २०२२ हे वर्ष भारताच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आठ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निकालांचा थेट परिणाम केंद्राच्या राजकारणावर होईल. या आठ राज्यांपैकी सहा राज्यांत भाजपचे सरकार आहे. यापैकी पंजाब हे एकमेव असे राज्य आहे, जेथे भारतातील मुख्य विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेसचे सरकार आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण राज्याचा दर्जा संपुष्टात आणल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर तेथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

या यादीत महाराष्ट्राचे नाव समाविष्ट नाही. परंतु महाराष्ट्रातही पुढच्या वर्षी निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये घेण्यात आल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली आणि त्यांना पूर्ण बहुमत मिळाले. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या अट्टहासापायी शिवसेनेने अनेक दशकांचे भाजपशी असलेले संबंध तोडले.

का पडू शकतं महाराष्ट्रात सरकार…

सध्या होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्र सरकार डळमळीत झालेलं आहे. हे महाविकास आघाडीचं सरकार अद्यापही सुरू राहण्याचे कारण केवळ आणि केवळ कोरोना महामारी आहे. या बिकट परिस्थितीत कोणालाही सरकार पाडण्याची इच्छा नाहीये. अगदी भाजपादेखील नाही. परंतु ज्या प्रकारे केंद्रीय तपास संस्थांचा फास आवळत चालला आहे त्यावरून कोरोना महामारी नियंत्रणात येताच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

केवळ सत्तेसाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसची साथ घेतल्याने शिवसेना व ठाकरे कुटुंबाचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे भाजपच्या पारड्यात गेला आहे. जर शिवसेना भाजपसोबत परत आली नाही तर अकाली निवडणुका निश्चित असल्याचे स्पष्ट आहे. आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनविण्याची आणि मुख्यमंत्रिपद भाजपकडे देण्याची शिवसेनेची ऑफर असू शकते. अर्थात, राजकारणात काहीही अशक्य नाही. केंद्रीय तपास संस्थांकडून भ्रष्टाचार प्रकरणांत हळूहळू मोठे मासे गळाला लागत आहेत. यामुळे शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे, सरकारमधील मंत्र्यांच्या चारित्र्यावर उडालेले शिंतोडे यामुळे राज्यात सरकारविरोधी सुप्त लाट आहे. जसजशी भ्रष्टाचार प्रकरणांची पोलखोल होत जाईल तसतसे हे सरकार पतनाकडे जाईल, अशीच सध्याची परिस्थिती आहे. यामुळेच 2022 मध्ये महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका झाल्यास नवल नाही.

Possibility Of Maharashtra Assembly Elections in 2022

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात