India Fighting Back : जर्मनीहून एअरलिफ्ट केली जाणार प्रतितास २४०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारे २३ फिरती यंत्रसंच!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने जर्मनीहून २३ फिरती ऑक्सिजन निर्मिती यंत्रसंच हवाईमार्गे देशात आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिमिनीट ४० लिटर आणि प्रतितास २४०० लिटर ऑक्सिजन निर्मितीची प्रत्येक यंत्रसंचाची क्षमता आहे.India to airlift 23 mobile oxygen generation plants from Germany

ती कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सशस्त्र दलांच्या (AFMC) वैद्यकीय रुग्णालयांत बसविले जातील.हवाई दलास मालवाहू विमाने सज्ज ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.



भविष्यात परदेशातून असे आणखी यंत्रसंच मिळविले जातील. सहज हलविण्याच्या सुविधेमुळे हे यंत्रसंचांचे महत्त्वाचे ठरतील. येत्या आठवड्यात ही संच भारतात येतील.

चार दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दले तसेच इतर संरक्षण संस्थांना आपत्कालीन आर्थिक अधिकार प्रदान करण्यात आल्याचे जाहीर केले होते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आवश्यक साहित्य मिळविता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

India to airlift 23 mobile oxygen generation plants from Germany

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात