विशेष प्रतिनिधी
मुंबई: विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्या तन्मय फडणवीस यांने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. Face to face: BJP’s Vijaya Rahatkar shows mirror to Shiv Sena’s Priyanka Chaturvedi who taught Devendra Fadnavis rules on vaccine issue
मात्र त्यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी एका ट्विटने रोखून धरले. रहाटकर यांच्या ट्विट नंतर अनेकांनी रिट्विट करत प्रियंका चतुर्वेदी यांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात यापेक्षा कितीतरी मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत आधी ते सोडवा अशा प्रतिक्रीया नेटकर्यांनी दिल्या आहेत.
One of my friends got vaccination out of protocol to avoid wastage. Anyways it's open for all now. There r bigger issues in MH to talk about. — OneWorldFamily 🌍 🇮🇳 (@rakeshsharma767) April 20, 2021
One of my friends got vaccination out of protocol to avoid wastage. Anyways it's open for all now. There r bigger issues in MH to talk about.
— OneWorldFamily 🌍 🇮🇳 (@rakeshsharma767) April 20, 2021
काय म्हणाल्या विजया रहाटकर?
जेव्हा आपल्या स्वतःच्या पक्षाचे आमदार, महापौर, त्यांची मुलं यांनी नियमांचे उल्लंघन करून लस घेतली त्यावेळी आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले .परंतु देवेंद्र फडणवीस जी यांच्या एका दूरच्या नातेवाईकांने लस काय घेतली तुम्ही तर चक्क नियम आणि प्रोटोकॉल दाखवत आहात. कुणीतरी म्हण्टले आहेच ‘ याला म्हणतात डबल स्टँडर्डिटिस!
हिंदी मे कहते है , ‘सौ चुहें खाकर …
यासोबतच त्यांनी एका बातमीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन करून शिवसेनेचे ठाणे महापौर नरेश म्हस्के ह्यांनी लस घेतल्याचे दाखवण्यात आले आहे.
When her own parties MLA, Mayor, their Sons tooks out of turn vaccines, You just ignored. But a distant relative of Shri @Dev_Fadnavis Ji took vaccine, You rushed to Preach Rules & Protocols. Like Someone said, this is Double Standarditis! हिंदी मे कहावत है, 'सौ चुहें खाकर..' https://t.co/mRoVWk0e6i pic.twitter.com/clJbDcRVit — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) April 20, 2021
When her own parties MLA, Mayor, their Sons tooks out of turn vaccines, You just ignored.
But a distant relative of Shri @Dev_Fadnavis Ji took vaccine, You rushed to Preach Rules & Protocols.
Like Someone said, this is Double Standarditis!
हिंदी मे कहावत है, 'सौ चुहें खाकर..' https://t.co/mRoVWk0e6i pic.twitter.com/clJbDcRVit
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) April 20, 2021
काय आहे प्रकरण?
कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही. यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना भाजपाच्या विजया रहाटकर यांनी देखील ट्विट करत प्रियंका चतुर्वेदीला आरसा दाखवून दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App