विशेष प्रतिनिधी
कोलकता – महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिाम बंगालसारखी राज्ये पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधानांनी प्रतिमा संवर्धनासाठी अन्य देशांत लशींची निर्यात केली अशी टीका पश्चि्म बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. Mammata lashes on PM modiji
प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनावरील लस खुल्या बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा मोदी यांनी काल केली. पण कुठे आहे खुला बाजार, कोठे लस उपलब्ध आहे, असा सवाल करीत देशातील लशींचा मोठा साठा तुम्ही याआधीच विदेशात पाठविला आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे ‘अकार्यक्षमतेचे प्रतीक’ आहे. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आपल्याला प्रचंड तुटवडा जाणवत आहे,
ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोरोनावर उपाय योजण्याऐवजी बंगालमधील निवडणुकीचे डावपेच आखण्यात केंद्रातील नेतृत्व मग्न आहे. रामनवमीला दंगल घडविण्याचे कारस्थान आहे. ते हाणून पाडा. काँग्रेस व डाव्या पक्षांचे उमेदवार म्हणजे भाजपचा दुसरा चेहरा असल्याने त्यांना मत देऊ नका .’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App