ममता बॅनर्जींचा डबल गेम!पंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदत?सभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळी दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात पसरत असलेल्या संक्रमणा संदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. एकीकडे त्यांनी पंतप्रधानांकडे लसींसह रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सीजन आणि औषधांची मागणी केली आहे.Mamata Banerjee’s double game! Should PM resign or PM’s help? PM blamed for meeting, letter sought help

ही मदत लवकरात लवकर पाठवावी असेही त्यांनी म्हटले आहे.तर दुसरीकडे पंतप्रधानच वाढत्या कोरोनाला जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा असेही त्या म्हणाल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील कोरोनाच्या वाढत्या घटनांसाठी पंतप्रधानावर दोषारोप करणार्‍या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवताना मात्र बाहेरील लोकांना यासाठी जबाबदार मानले आहे.  त्यांनी लिहिले की, “राज्यात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, निवडणूक प्रचार आणि इतर कारणांमुळे मोठ्या संख्येने बाहेरील लोक काही राजकीय पक्षांकडून येत आहेत. आम्ही हा रोग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काम केले आहे आणि तीन मुद्द्यांवर तुमचा हस्तक्षेप आवश्यक आहे. ”

ममता बॅनर्जी यांनी लिहिले की, “लसीकरण सर्वात महत्वाचे आहे.विशेषत: आमच्या राज्यात कोलकातामध्ये, जेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. जलद लसीकरण आवश्यक आहे.

दुर्दैवाने आमच्यासाठी भारत सरकारकडून लसींचा पुरवठा कमी आहे, यामुळे आमच्या लसीकरणावर नकारात्मक परिणाम होत आहे. आम्हाला 27 दशलक्ष लोकांचे लसीकरण करावे लागेल आणि आम्हाला 54 दशलक्ष डोसची गरज आहे.आम्ही तुमच्याकडून त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी करतो जेणेकरून आवश्यकतेनुसार ही लस राज्याला मिळेल.

रेमाडेसिव्हिर सारख्या अत्यावश्यक औषधांचा पुरवठाही कमी असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता म्हणाल्या की, राज्यात दररोज 6000 रेमाडेसिव्हिर आणि 1000 टोसिलिजूमैबची आवश्यकता आहे. म्हणूनच या औषधांचा  पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. तसेच ऑक्सिजन पुरवठा वाढवावा असे आवाहन देखील केले आहे.

 

Mamata Banerjee’s double game! Should PM resign or PM’s help? PM blamed for meeting, letter sought help

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी