DRDO : देशभरात कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊन ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत संशोधन व विकास संस्था (DRDO)ने कोरोना रुग्णांसाठी SpO2 (Blood Oxygen Saturation) पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीचा वापर उंच ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या जवानांसाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोरोना रुग्णांसाठीही हे संशोधन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. DRDO new research will be a boon for corona patients, oxygen cylinder hassle will end
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊन ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत संशोधन व विकास संस्था (DRDO)ने कोरोना रुग्णांसाठी SpO2 (Blood Oxygen Saturation) पूरक ऑक्सिजन वितरण प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीचा वापर उंच ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या जवानांसाठी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोरोना रुग्णांसाठीही हे संशोधन एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
संरक्षण मंत्रालयाने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ही ऑटोमॅटिक यंत्रणा कोरोनाच्या या संकटाच्या काळात वरदान ठरेल. डीआरडीओ, बंगळुरूच्या डिफेन्स बायो-इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लेबॉरेटरी (DEBEL) द्वारे विकसित, सिस्टम SpO2 एक लेव्हल सेट करत रुग्णाला हायपोक्सियाच्या स्थितीत जाण्यापासून वाचवतो. हायपोक्सियाची स्थिती बहुतांश बाबतीत प्राणघातक ठरते.
दरम्यान, हायपोक्सिया ही एक अशी अवस्था असते ज्यात शरीरातील ऊतींपर्यंत पोहोचणारा प्राणवायू शरीराच्या सर्व ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा नसतो. कोरोना संसर्गांनंतर रुग्णांमध्येही अशीच लक्षणे दिसून येतात. वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही, तर मृत्यूची शक्यता बळावते.
कोरोनाामुळे वाढणाऱ्या मृत्यूंचे कारण ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता मानले जात आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यंत गरजेचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर डीआरडीओच्या या प्रणालीचा वापर रुग्णांसाठी वरदान ठरू शकतो. यामुळे SpO2वर देखरेख करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील बराच ताण कमी होण्यास मदत होईल.
DRDO new research will be a boon for corona patients, oxygen cylinder hassle will end
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App