हाफकीन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनाची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.Uddhav Thackeray thanked the Prime Minister, permition to vaccine production in Hafkin
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हाफकीन इन्स्टिट्यूटला लस उत्पादनाची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते,
असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी महाराष्टÑाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,
वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास एक वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉपोर्रेशन यांनी उत्पादन सुरु करावं,
तसंच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
अशावेळी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. मी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विषय मांडला आहे. हाफकिन ही देशाला पोलिओ मुक्त करणारी संस्था आहे.
तिची कल्पना पंतप्रधानांना दिली आहे. या संस्थेला पुन्हा ताकद देण्याची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाले होते.भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं.
महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करुन हाफकिनकडून लस निर्मिती करेल.. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तेव्हा टोपे यांनी दिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App