विशेष प्रतिनिधी
कूचबिहार – मला तुमच्या घरातील मुलगी समजा असे भावनिक आवाहन करीत केंद्रीय सुरक्षा दलांच्या गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. Mamata didi meets family members of diseased families
निवडणुकीदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे राज्याचे राजकारण ठवळून निघाले आहे. प्रचारामध्ये हा मुद्दा सध्या महत्वाचा बनला असून ममतादीदी व भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
निवडणूक आयोगाने २४ तासांची बंदी घातली होती, नाही तर माझ्या बहीण-भावांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मी खूप आधीच आले असते. या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांनी शिक्षा दिली जाईल. निवडणूक झाल्यावर मृतांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतळे उभारले जातील,’’ असे त्यांनी सांगितले.
‘‘दीदींनी बोलावले म्हणून आम्ही येथे आलो. निवडणूक संपली की मदत करण्याचे आश्वाासन त्यांनी आम्हाला दिले आहे. पण मारेकऱ्यांनी शिक्षा करावी, अशी आमची प्राथमिक मागणी आहे,’’ असे एका मृताच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.
दीदी आम्हाला भेटल्या. न्याय मिळण्याची आम्हाला खात्री आहे. ही घटना घडल्यापासून आम्ही नीट विचारही करू शकत नाही, असे एका मृताचा भाऊ मंजूर अलीमियाँ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App