विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुख्यमंत्री महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन चालले आहेत… आजच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून हीच बाब अधोरेखित झाली. लादले असूनही रुग्णवाढ कमी झालेली नाही. त्यामुळेच करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. all party meeting CM streaching maharashtra towards lockdown
आपण हा निर्णय एकमताने घेतला पाहिजे. राज्यात लॉकडाऊन लावल्यास महिनाभरात परिस्थिती नियंत्रणात आणता येईल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठकीत मांडले. तत्पूर्वी, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर प्रेझेंटेशन सादर केले.
पूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो. तेव्हा जनभावनांचा विचार करूनच निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यात ८ ते १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत राज्यातील करोनाची सध्याची स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यावर प्रकाश टाकला. करोनाबाबत जे अंदाज आहेत ते पाहता १५ एप्रिल ते २१ एप्रिल यादरम्यान परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. सध्या जे नवे रुग्ण आढळत आहेत त्यात तरुणवर्गाचा सर्वाधिक समावेश आहे.
करोनाचे रोजचे आकडे काळजी वाढवणारे आहेत. यंत्रणांवर ताण येत आहे. त्यातून यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये यासाठी आपल्याला ठोस पावले टाकावी लागणार आहेत. काहीही करून करोनाची साखळी आपल्याला तोडावीच लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय दिसतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
-फडणवीस – टोपे राजकीय जुगलबंदी
या बैठकीत देवेंद्र फडणवीस – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगली. कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मदत करावी. यामध्ये मी राजकारण आणत नाही, असे राजेश टोपे म्हणाले. त्यांनी राज्याला वैद्यकीय उपकरणांची मदत केंद्राकडून मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यावर फडणवीसांनी आम्हीही राजकारण करीत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांना सांगावे, असे सूचित केले. मदतीसाठी केंद्राकडे बोलण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी बैठकीत दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App