विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. चे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी आज सांगितले. अर्थव्यवस्था सुधारत असली तरी कोरोना संसर्गामुळे आर्थिक दरी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. World bank appreciate Indian Economy
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनीच ही अशादायी माहिती दिली आहे. ही चांगली बातमी असली तरी जगात असमानताही वाढत आहे. लस वाटप, लसीकरण, उत्पन्नाची संधी याबाबतीत असमानता दिसून येत आहे.
गरीब देशांमध्ये अद्यापही कर्जदर प्रचंड असून जगात इतरत्र हे दर कमी झाले असले तरी गरीब देशांमध्ये परिस्थिती बिकट आहे. युरोपात लसीकरणाचा वेग काळजी करण्याइतपत धिमा आहे. लसीकरण मोहिम राबविताना अनेक देशांना अडचणी येत आहेत. मात्र, या अडचणींवर मात करून लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यतक आहे.
वाचा आणखी महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App