हातावर पोट असणाऱ्या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा असा इशारा वंचित बहुजन विकास आघडीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. Reverse your decision before people rebel; Prakash Ambedkar’s implicit warning to Thackeray government
विशेष प्रतिनिधी
पुणे : हातावर पोट असणाऱ्या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री कोरोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेत आहे. लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा असा इशारा वंचित बहुजन विकास आघडीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सरकारच्या निर्णयावर हल्लाबोल केला .आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले. पंढरपूर देवस्थान बाहेरील व्यावसायिकांना भिक्षा मागण्याची वेळ आली आहे.
लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा. नंतर मग आम्ही एक आणि तुम्ही दुसरी भूमिका घेताय असं म्हणू नये. दुकानदार ऐकण्याच्या स्थितीत नाहीत.त्यांनी दुकान उघडलं तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत. भले त्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली तर हरकत नाही.
परमबीर सिंग आणि इतर प्रकरणे दाबण्यासाठी कोविड आणला का? असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, सरकार लॉकडाऊ बाबत वंचितसोबत बोललेले नाही, बाकीच्यांशी काय बोलले माहिती नाही.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App