9th and 11th class Exams Cancelled : मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. असे असले तरी 10वी आणि 12वीच्या परीक्षा या मात्र ऑफलाइनच होणार असून त्यांच्या वेळापत्रकाबाबत बदल करायचा किंवा कसे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. Breaking News 9th and 11th class All students will be Promoted in Next Class
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. असे असले तरी 10वी आणि 12वीच्या परीक्षा या मात्र ऑफलाइनच होणार असून त्यांच्या वेळापत्रकाबाबत बदल करायचा किंवा कसे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, शिक्षण विभागाने याआधीच इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षाच रद्द करून या मुलांना प्रमोट करण्यात यावे, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो पूर्वीपेक्षा अधिक गंभीर असल्याने चिंता वाढल्याचं मत त्यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं.
राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु, राज्यातील करोनाची स्थिती पाहता पालकांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी झाली. दहावीच्या परीक्षेला साधारणपणे 17 लाख, तर बारावीच्या परीक्षेला 15 लाख विद्यार्थी बसणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या काळात होणार आहे. परंतु ऑनलाइन परीक्षेसाठी एकाच वेळी 32 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागेल. एकाच वेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. दुसरीकडे, विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. या परीक्षेत गैरप्रकार व गोंधळ होण्याची शक्यता अधिक असल्याने, मंडळाकडून ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यात आली आहे. तरीही या परीक्षांच्या वेळापत्रकात काही बदल होतोय किंवा नाही, याबाबत येत्या दोन दिवसांत शिक्षण विभागातर्फे माहिती देण्यात येणार आहे.
Breaking News 9th and 11th class Exams Cancelled All students will be Promoted in Next Class
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App