Naxal Attack : जगदलपूरमध्ये गृहमंत्री अमित शहांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली, जखमी जवानांचीही घेणार भेट

Home Minister Amit Shah pays homage to martyrs in Naxal Attack At Jagdalpur Chhattisgarh

Naxal Attack : विजापूर येथे शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झाले, तर 31 जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जगदलपूर येथे पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच ते जखमी जवानांचीही भेट घेणार आहेत. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. गृहमंत्री उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर गृहमंत्री बासागुडा येथील सीआरपीएफ छावणीला भेट देणार आहेत. Home Minister Amit Shah pays homage to martyrs in Naxal Attack At Jagdalpur Chhattisgarh


विशेष प्रतिनिधी

रायपूर : विजापूर येथे शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झाले, तर 31 जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जगदलपूर येथे पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच ते जखमी जवानांचीही भेट घेणार आहेत. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते. गृहमंत्री उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर गृहमंत्री बासागुडा येथील सीआरपीएफ छावणीला भेट देणार आहेत.

नक्षलवादी हल्ल्याच्या बातमीनंतर काल गृहमंत्र्यांनी आपला निवडणूक दौरा रद्द करून दिल्लीला परतले होते. या हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशीही चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. यासह त्यांनी सीआरपीएफ डीजींना तातडीने विजापूर येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या.

नक्षलवाद्यांसाठी नवी रणनीती

बस्तरच्या विजापूरमध्ये जवानांचा घातपात करणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात केंद्र आणि राज्य सरकारांनी नवीन रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीला आयबीचे संचालक, गृहसचिव, सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या हल्ल्याबाबत केंद्र सरकार छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांच्या सविस्तर अहवालाची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, सीआरपीएफचे डीजीही रायपूरला पोहोचले आहेत.

Home Minister Amit Shah pays homage to martyrs in Naxal Attack At Jagdalpur Chhattisgarh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात