देशातील कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्ड मीटरच्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपर्यंत चोवीस तासांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,03,764 वर पोहोचली. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून एकाच दिवसात आढळलेली ही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. Record breaking 1 lakh cases in a day in India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्ड मीटरच्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपर्यंत चोवीस तासांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,03,764 वर पोहोचली. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून एकाच दिवसात आढळलेली ही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 रोजी एकाच दिवसात 97,894 रुग्ण आढळले होते. हा पहिल्या लाटेतील सर्वोच्च आकडा होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, 24 तासांत देशात 513 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारत आता अमेरिकेनंतर असा दुसरा देश बनला आहे, जिथे एकाच दिवसात कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
भारतात सलग दुसर्या दिवशी जगाच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेत एका दिवसात 66,154 रुग्ण, तर 41,218 रुग्णांसह ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात कोरोना संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना संक्रमणाच्या दुप्पट होण्याची वेळ आता 104 दिवसांवर आली आहे, 1 मार्च रोजी हा कालावधी 504 दिवसांवर होता. यासह कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेशचा समावेश केल्यामुळे सर्वाधिक बाधित राज्यांची संख्या 12वर गेली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की गेल्या चोवीस तासांतील 81 टक्के रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 57,074 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, 12 राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ यांचा समावेश आहे.
Record breaking 1 lakh cases in a day in India
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App